ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा

पांढरीपुल येथील कला केंद्रावर झालेल्या वादाचे पडसाद…

शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे दि. ५ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भरतराम किसनराव पालवे (वय.५०) रा. खोसपुरी शिवार पांढरीपुल यांचे येथे कला केंद्र आहे. त्या ठिकाणी तेथील महिलांसोबत आरोपी अक्षय रामदास चेमटे , आकाश चेमटे रा घोडेगाव सचिन महादेव दराडे, आकाश मच्छिंद्र दराडे, किरण संपत दराडे, प्रशांत दराडे, सर्व राहणार वंजारवाडी, महेश विलास दरंदले रा. सोनई, संतोष पठाडे, अरबाज शेख रा. वडाळा, व त्यांचे सोबत आणखी तीन ते चार अनोळखी यांचे वाद झाले होते.

गुन्हा

त्यांना समजावून सांगण्या करीता तेथील महिलांसोबत पालवे हे वंजारवाडी या ठिकाणी गेले असता त्यांना त्या ठिकाणी वरील सर्वांनी मिळून हातात चाकु, लोखंडी गज , तलवार, लाकडी दांडके,लोखंडी पाइप ने मारहाण करत जखमी केले. तसेच सोबत असलेल्या महीलांना लाथाबुक्यांनी मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दि. ८ रोजी दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र नं. १७८/२०२५ बिएनएस चे कलम १०९,११८(१), ११५(२), ७४ , १८९(२), १९१(२), १९१(३), १९०,३५२,३५१(२) (३), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी , पोलीस उप निरीक्षक सुरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!