ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कत्तली

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे राहुरी रोडवरील काॅलेज जवळ तीन पिक अप जनावरांना कत्तली साठी नेत असताना पकडले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी दि. १४ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास रोडवर एम एच ०९ सिसी ५८८८ व एम एच ०९ ईएम ३७७६ तसेच एम एच ०४ एच एस ००६२ क्रमांक असलेले तीन पिअप व त्यामध्ये विविध जातीचे जनावरे कृरतेने डांबुन कत्तली साठी नेत असताना पकडले .त्यामध्ये एकुण एक लाख ऐंशी हजार रुपयांचे जनावरे व सात लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे पिक अप असा एकुण नऊ लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.

कत्तली

सोमनाथ सुभाष हरेल रा. ब्राम्हणी यांनी सिद्धेश्वर मच्छिंद्र भावले, अशोक शहादेव बुधनर दोघे राहणार खामगाव जिल्हा बिड, परमेश्वर महादेव कोटेकर राहणार शिंगवेगाव, जिल्हा बिड, अर्जुन सर्जेराव सोलनकर, नितीन अर्जुन कोपनर, युवराज शिवाजी लगडे,रिजवानखान अयुबखान पठाण, सर्व राहणार खामगाव जिल्हा बिड, हरिश्चंद्र दासराव हाके रा. माळेवाडी, अझरखान कुरेशी, सादिक अन्सार कुरेशी सर्व राहणार पिंपळनेर जिल्हा बिड यांचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. १९२/२०२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५( अ), ५(ब), चे उल्लघंन ९ तसेच प्रतिबध नियम ११ बिएनएस चे कलम ३(५) , मोटार अधिनियम कलम १९२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

कत्तली
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कत्तली
कत्तली

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कत्तली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *