ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मृतदेह

नेवासा : माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने करत माका (ता. नेवासा) येथे विवाहितेचा गळा आवळून खुन करण्यात आला.

विवाहितेचे वडील गणेश मच्छिंट्र एडके (रा. मुथलवाडी, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली आहे. पूजाचा (वय २२) विवाह चार वर्षांपूर्वी माका येथील अशोक अर्जुन गोरे याच्याशी झाला होता. पहिले काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला.

मृतदेह

अशातच त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा ती गरोदर राहिली. तिचा छळ मात्र थांबत नव्हता. १५ मे रोजी तिच्यावर रागाच्या भरात लैंगिक अत्याचार करत गळा आवळून तिला ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात मृतदेह टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सख्ख्या भावांना अटक

अशोक अर्जुन गोरे (पती) व त्याचा सख्खा भाऊ पांडुरंग अर्जुन गोरे (रा. माका, ता. नेवासा) या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. नेवासा न्यायालयाने या दोघांना २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृतदेह
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृतदेह
मृतदेह
मृतदेह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृतदेह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *