गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण ने सुटका केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी दि. ८ रोजी चांदा येथील एका चर्च च्या मागे असलेल्या काटवनात आरोपी सलिम राॅफ कुरेशी, साकीब जावेद कुरेशी, मुस्ताकिम कुरेशी सर्व रा. चांदा यांनी महाराष्ट्रात गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी मनाई असताना देखील काही गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले होते. एकुण दोन लाख तिस हजार रुपये किंमतीची गोवंशीय जनावरांची येथुन सुटका करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस काॅस्टेबल किशोर शिरसाठ यांनी याबाबत सोनई पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा र नं. २२२/२०२५ महाराष्ट्र पशु अधि नियम कलम ५(अ), ५(ब) ९ सह प्राण्यांना छळ प्रतिबध कलम ३,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गव्हाणे हे करत आहेत.
चांदा अजूनही मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांची कत्तल होत असताना पोलीस प्रशासन व गुन्हे अन्वेषण विभाग नेमके करतात तरी काय. आठ दिवसात दोनदा कारवाई होऊन सुध्दा येथील कत्तल खाने बंद होताना दिसत नाही. नेमके येथील कसायांना आशिर्वाद खाकी चा की आणखी कुणाचा असा प्रश्न सध्या परिसरात भेडसावत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.