गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथे फटाके फोडल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. १४ रोजी फिर्यादी सुशांत बंडु तारक (वय.१६) याने घरात फटाके सापडली म्हणून बाहेर अंगणत ते वाजवले होते त्याच कारणावरून शेजारीच राहणारे आरोपी जावेद पठाण, शायद पठाण, अल्ली पठाण, राजु पठाण सर्व राहणार सोनई (हनुमानवाडी) यांनी फिर्यादीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा र. नं. ३६६/२०२५ बिएनएस चे कलम ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप. निरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.