ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आंदोलन

तालुक्यातील अंध व मूकबधिर लाभार्थ्यांचा सहभाग; 45 दिवसात तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालनात मूक बधिर, अपंग समवेत ठिय्या आंदोलन करणार संदीप कुसळकर यांचा इशारा

गणेशवाडी – नेवासा तहसील कार्यालयातील स्वस्त धान्य पुरवठा विभागाच्या अकार्यक्षमता आणि अनागोंदी कारभाराविरोधात आज 12 रोजी तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये अंध, अपंग मूकबधिर व वंचित लाभार्थी सहभागी झाले होते त्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या. आंदोलनादरम्यान तहसीलदारांना निवेदन देत नागरिकांनी 45 दिवसांत प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन ठिय्या आंदोलन मा जिल्हाधिकारी यांच्या यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

आंदोलन

नेवासा पुरवठा विभागाकडून अंध अपंग व मूकबधिर यांच्याकडून सुद्धा पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी चिरीमरीची अपेक्षा करत असल्याचे निदर्शनास आले असल्याने वडार सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सोनई चे माजी उपसरपंच संदिप कुसळकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला असून पुरवठा विभागाबद्दल अनेकांच्या तक्रारी असून सुद्धा तहसील कार्यालयाकडून या विभागातील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू असल्याने यावर निश्चित तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा इशारा कुसळकर यांनी दिला आहे सध्या अनेक लाभार्थी कुटुंबातील रेशनकार्डधारकांच्या कुपनवरील नावे हटवली गेली, आहेत आधार क्रमांक अद्ययावत न होणे, ऑनलाइन यादीत नावे दिसत नसणे, रेशन कार्ड कायमचे बंद करणे यामुळे वंचित घटकांना जीवनावश्यक धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलन

अंध सागर चांदणे, मूकबधिर नवनाथ कुसळकर, नितीन शेटे अजय मोरे विजय तुवर शिरेगाव यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी स्वतः हजर राहून प्रशासनाकडे निवेदन दिले. मूकबधिर नवनाथ कुसळकर यांनी तहसीलदार साहेब यांना खुणा खुनी करून सांगितले की, “आम्हालाही जगायचं आहे, आम्ही फक्त न्याय मागतोय.” सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ कुसळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला “जर 45 दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.” तहसीलदार साहेबांनी नागरिकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद देत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.या आंदोलनात अनिल निमसे, गणेश गडाख, कपिल चंदेल, नामदेव येळवंडे ,विकास लाटे, गणेश साळवे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *