ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्वागत

शिक्षिकांनी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन केल स्वागत.

सोनई | संदिप दरंदले – तब्बल दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार आज गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्याने परिसर गजबजला.आज दि.16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस होता. यानिमित्ताने सोनईच्या महादेव मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकांनी मुलांचे औक्षण करुन व फुलांची उधळण करून जंगी स्वागत केले.

स्वागत

सोमवार दि.16जून रोजी शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी सोनईच्या जिल्हापरिषद शाळेने मुलांना खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि फ़ुगे सोडून मुलांचे स्वागत करण्यात आले. या नवागतांचा शाळेतील पहिल्या दिवसाचा स्वागत सोहळा सोनई गावात सर्वत्र रंगला होता.शाळेतील मुख्याध्यपिका परवीन शेख,शारदा वराडे,यमुना भुसारी,अंजली महामेर,अर्चना पोटघन यांनी मुलांचे औक्षण करून दिलेल्या गुलाबपुष्पाने मुलांचे चेहरे खुलले होते.या बालगोपालांवर फुलांच्या पाकळ्याची उधळण केली.

स्वागत

यावेळी सोनईच्या प्राथमिक शाळेतील सर्व नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.तसेच सर्व मुलांच्या हातात फुगे देऊन ते आकाशात सोडले गेल्याने मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.तसेच यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार संदिप दरंदले,केंद्र प्रमुख एच.के फुंदे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दत्तात्रय गायके,सोनई ग्रामपंचायत सदस्य अंबादास राऊत यांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियानांतर्गत मुलांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलांना नवीन गणवेश आणि पाठयपुस्तके हातात मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता.

स्वागत

सोनई महादेव मंदिर येथील जिल्हा परिषद शाळा ही सर्वात जुनी शाळा असल्याने येथे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे शिक्षकांचे चांगले लक्ष असते.तसेच येथील शिक्षक शैक्षणिक वर्षात विविध शालेय उपक्रम राबवत असल्याने पालकवर्ग आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवत आहेत.सोनई जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या स्वागत सोहळा चांगला करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख,शारदा वराडे,यमुना भुसारी,अंजली महामेर,अर्चना पोटघन यांनी मोठे कष्ट घेतले.यावेळी प्रमुख पाहूणे पत्रकार संदिप दरंदले, केंद्रप्रमुख फुंदे सर, अंबादास राऊत यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील नवगत मुलांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाची प्रचंड चर्चा सोनई परिसरात झाली.

स्वागत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वागत
स्वागत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *