गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे किरण जनार्दन शिंदे रा.बेल्हेकरवाडी यांचे बेटेक्स दुकान आहे.दि.३रोजी नेहमी प्रमाणे दिवसभराचे काम आटपून दुकान बंद करून घरी गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले असता समोर त्यांना आपल्या दुकानचे शटर उचकटलेले दिसले . आत जाऊन पहाणी केली असता आतील एक ग्रॅम ज्वलरी चे दहा हजार रुपये किंमतीच्या जेन्टस चैन, पाच हजार राणीहार, चार हजारांचे गंठन, झुबे दोन हजार रुपये किंमतीची असा एकुण एकविस हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे आढळून आले .त्या नुसार दि. ४ रोजी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्या नुसार गुन्हा र नं. २५५/२०२५ बिएनएस चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.