सोनई – स्मार्ट किड्स अकॅडमी, सोनई येथे दिनांक ५जुलै २०२५रोजी आषाढी एकादशीचा उत्सव पारंपरिक भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विठ्ठल खाडे महाराज,रवींद्र शेटे साहेब, ज्येष्ठ पत्रकार विनायक तात्या ,शाळेचे संस्थापक परेश लोढा सर,आदरणीय प्राचार्य लोढा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारीमध्ये सहभागी होऊन “पांडुरंग विठोबा रुख्मिणी माता की जय” चा गजर केला. शाळेच्या परिसरात छोटेखानी पालखी सोहळा काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभंग गायन, वेशभूषा स्पर्धा, नृत्य सादरीकरण, हरिपाठ नाटिका,पांडुरंग-माऊली संवाद अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर ‘वारीची परंपरा व महत्त्व’ यावर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील एकतेचा, शिस्तीचा आणि भक्तीचा संदेश दिला. यानिमित्ताने मुलांमध्ये पारंपरिक संस्कृती, भक्तीभाव आणि सामूहिकतेचे महत्त्व रुजवले गेले.
संपूर्ण कार्यक्रमाने शाळा भक्तिमय वातावरणाने भारून गेली होती. सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला.
शाळेच्या प्रांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात दिंडी सोहळा साजरा झाला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी फेर धरून फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. रिंगण सोहळ्यात विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन सामील झाले. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या.

पावसाच्या रिमझिम सरीतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकही उपस्थित होते. मुख्याध्यापिका सोनल लोढा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष दिंडीचा विद्यार्थ्यांना अनुभव आला. दिंडीच्या वाटेतील दिवेघाट, चंद्रभागा नदीचे महत्व, पंढरपूरमधील प्रत्यक्षात पांडुरंग मूर्ती दर्शन देखावे आदी उभारण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन गडाख मॅडम,वैभव बऱ्हाटे सर, यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका कुदळे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली सर्वात शेवटी पांडुरंगाच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.