गणेशवाडी – महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव (खेडले) येथील विद्यार्थी प्रथमेश आदिनाथ गिरी याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात बारावा क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. उदयन दादा गडाख, सचिव मा. उत्तमराव लोंढे सहसचिव डॉ. विनायक देशमुख, गावातील ग्रामस्थ, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक लहानू ढाले सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रथमेशचे विशेष अभिनंदन केले .त्याला गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्याच्या आई व आजीचा ही या वेळी सन्मान करण्यात आला.

त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व आनंद झळकत होता. शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि स्वतःची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याचे प्रथमेशने सांगितले.
या वेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील तुवर, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा . लहानु ढाले ,मुळा एज्युकेशन शाळा समितीचे सदस्य दगू बाबा हवालदार, नय्युम भाई इनामदार ,शिरेगावचे उपसरपंच लक्ष्मण जाधव ,योगेश वैरागर, पत्रकार व समाजसेवक संभाजी शिंदे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.