ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
टोळी

नेवासा- दि.16/07/2025 रोजी रात्री 22.00 वा.सुमारास यातील फिर्यादी अरूण जगन्नाथ गंगावणे, वय 48, रा.महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर हे घरी जाण्यासाठी घोडेगाव, ता.नेवासा येथे वाहनाची वाट पाहत थांबले असताना यातील अज्ञात आरोपीतांनी त्यांना प्रवाशी म्हणुन कारमध्ये बसवून, फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम, मोबाईल जबरीने काढुन घेतले.याबाबत सोनई पोलीस स्टेशन गुरनं 269/2025 बीएनएस 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस यांना जिल्हयातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संदीप दरंदले, फुरकान शेख, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, मयुर गायकवाड अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

टोळी

दिनांक 18/06/2025 रोजी पथक नमूद गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा विश्वास रमेश पंडीत, रा.भावी निमगाव, ता.शेवगाव याने त्याचे साथीदारांसह मिळून केला.तसेच त्यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांक एमएच-12-एनएक्स-2406 वापरले असून ते वांबोरी येथून अहिल्यानगरकडे येणार असल्याची माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष वांबोरी फाटयाजवळ संशयीत कारचा शोध घेऊन, संशयीत कार मिळून आल्याने कार थांबूवन 1) विश्वास रमेश पंडीत, वय 28 2) रोहन बाळासाहेब मोरे, वय 21 3) संदेश अनिल पेटारे, वय 21 4) सोपान पांडुरंग वाबळे, वय 27, सर्व रा.भावी निमगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील हुंडाई कार क्रमांक एमएच-12-एनएक्स-2406 हिच्यामधुन त्याचा आणखी साथीदार 5) दिपक आहेर, पुर्ण नाव माहित नाही रा.मजले शहर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह घोडेगाव येथून एक इसमाना चांदा येथे सोडण्यासाठी प्रवाशी म्हणुन बसून त्यास चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल काढुन घेतल्याची माहिती सांगीतली.

टोळी


पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 5,35,000/- रू किंमत त्यात हुंडाई कंपनीची एसेंट कार व 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, व मा.श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

टोळी
टोळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

टोळी
टोळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

टोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *