ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सांडपाणी

नेवासा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतीने अमरधामच्या मागील भागात विना प्रक्रिया सांडपाणी थेट वस्ती व शेतीकडे सोडल्याने गंभीर आरोग्य व पर्यावरणीय धोका निर्माण झाला आहे असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात घोडेगावचे आरोग्य कार्यकर्ते व समाजभूषण डॉ. संजय सोनवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे. एमपीसीबी च्या नाशिक प्रयोगशाळेच्या पाण्याच्या तपासणी अहवालानुसार पाण्यातील जैविक ऑक्सिजन गरज (बीओडी), रासायनिक ऑक्सिजन गरज (सीओडी) घनद्रव्ये (टीएसएस), नायट्रेट्स व फॉस्फेट्स यांचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

सांडपाणी

हे पाणी सीपीसीबी / आयएस १०५००:२०१२मानकांचे सरळ उल्लंघन करते. परिणामः परिसरात त्वचाविकार, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शेतजमिनीत सांडपाणी मिसळल्याने जमिनीची सुपीकता व भूजल दूषित होत आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे दिलेल्या निवेदनात डॉ. संजय सोनवणे यांनी प्रमुख मागण्या केल्या असून त्यात पर्यावरण संरक्षण

अधिनियम १९८६ व जल प्रदूषण अधिनियम १९७४अंतर्गत ग्रामपंचायतीवर तातडीने कारवाई करावी, जबाबदार अधिकारी (ग्रामसेवक व सरपंच) यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, नियमबद्ध सांडपाणी निचरा योजना राबविण्याचे आदेश निर्गमित करावेत, पाण्याची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, आरोग्य व पर्यावरणाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. जबाबदार अधिकारी आणि यंत्रणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, “अशी ठाम भूमिका डॉ. संजय सोनवणे यांनी मांडली आहे.

सांडपाणी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सांडपाणी
सांडपाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सांडपाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *