गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील एका हॉटेलात रविवारी सायंकाळी वाळू तस्करांमध्ये हाणामारीची घटना घडली.
एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान काही वाळू तस्कर जेवणासाठी आलेले होते. एक दिवस अगोदर आपआपसात वाद झाले होते. नंतर परत त्याचा बदला घेण्यासाठी या हॉटेल मध्ये काही युवक हातात लोखंडी टॉमी व काही धारदार हत्यारे घेऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी जेवणासाठी बसलेल्या पैकी दोन जणांवर हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. त्या मध्ये ते जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व तपासाच्या दृष्टीने सुचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

