गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पाटचारीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील अल्पभूधारक संदिप भाऊसाहेब येळवंडे यांची शेती गट नं ४८८/१ मध्ये ०.५२ आर एवढे क्षेत्र आहे. या मध्ये त्यांनी कापुस पिक घेतलेले आहे. परंतु त्यांच्या क्षेत्रातुन अनाधिकृत पणे गेलेल्या पाटचारीच्या पाण्याने त्यांच्या संपूर्ण क्षेत्रातील पिक पाण्याने डबडबुन गेले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाला या बद्दल वारंवार कळवुन देखील ते या कडे कानाडोळा करत आहे.

सलग पाच दिवसापासून या कपाशीमध्ये कालव्याचे आउटलेट १९/ब चेपाणी आहे. मुळा पाटबंधारे च्या चारी इन्स्पेक्टर ,उपअभियंता ,मुख्य अभियंता.यांना फोन द्वारे माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. फक्त या ठिकाणी येऊन पाहणी करतात व निघून जातात. नियमाप्रमाणे ही चारी नकाशा प्रमाणे नाही.गेली दहा वर्षापासून शेतकऱ्याला याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मुळे अनेक पिकाचं आतोनात नुकसान होत आहे.तरी संबंधित चारी ही अधिकृत नकाशा प्रमाणे घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.