गणेशवाडी – येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गंगाराम चौगुले यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे .
काशिनाथ चौगुले हे बहुजन समाजाती अनाथ मुला मुली साठी मोफत वस्ती गृह चालवित आहेत. निराधार भटक्या विमुक्त ,ऊसतोड कामगार ,वीट भट्टी मजूर ,शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी हे करतात.अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना चांगले संस्कार देतात.त्याच कार्याची दखल घेत त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहिर केला आहे.

विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्तृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक, हॉटेल रोज गोल्ड ,येथे दिनांक दहा रोजी शहराचे आमदार संग्राम भैया जगताप , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .यावेळी नगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुल सौंदर, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .चौगुले यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होतं आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

