गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महिलांचे गळ्यातील दागिने चोरणाऱ्या चार महीलांना सोनई पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.
ता बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. २३ रोजी अलका नारायण सुरुडकर रा. नवामोठा गोकुळ नगर जालना या दुपारी तीन वाजता घोडेगाव चौफुला येथे संभाजी नगर कडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना एका महिलेने माझ्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी केली. तिला मी प्रतिकार केला असता तिच्या सोबत असणाऱ्या आणखी तीन ते चार जणींनी मिळून माझ्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्राची चोरी केली. असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. आपल्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाल्याचे समजताच संबंधित महिलेने आरडाओरड केली.

तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच बस थांबवत संशयित चार महीलांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची झडती घेतली असता चोरी केलेले सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र मिळून आले. दाखल फिर्यादी नुसार आरोपी सखुबाई भानुदास जाधव , मुक्ताबाई आवेश जाकने दोघी राहणार मुकुंद वाडी छत्रपती संभाजी नगर, कांताबाई अमोल शिंदे , संगिता ऊर्फ रेश्मा गणेश शिंदे दोघी राहणार रेल्वे स्टेशन जवळ विश्रांती नगर छत्रपती संभाजी नगर यांच्या विरुध्द गुन्हा र. नं. ३१४/२०२५ बिएन एस चे कलम ३०७,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील आरोपी महीलांना दि. २५ पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.