सोनई – अहिल्यानगर वडगाव गुप्ता येथील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का कानसे हिला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत आरोग्य संशोधन विभाग यांच्याकडून प्रतिष्ठेचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे.
दंतवैद्यक क्षेत्रातील तिच्या नाविन्यपूर्ण संशोधन कल्पना, उत्कृष्ट कामगिरी आणि संशोधनविषयक कटिबद्धता यांची ही अधिकृत पावती आहे. तिच्या संशोधन प्रकल्पासाठी मार्गदर्शन प्रा. डॉ. पूजा भानवसे व डॉ. मेघा कदाणी यांनी केले.

अनुष्काच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, संस्थेचे पदाधिकारी आणि प्राध्यापक वर्गाने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संस्थापक माजी खा यशवंतराव गडाख,माजी मंत्री शंकरराव गडाख, उदयन गडाख, संस्थेच्या उपाध्यक्षा नेहल गडाख, डॉ. सुभाष देवढे, तसेच अधिष्ठाता डॉ. नीलिमा राजहंस यांनी अनुष्काचे कौतुक करत तिच्या आगामी संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे महाविद्यालयाचे संशोधन क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले असून, भविष्यातील संशोधन विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायक बाब ठरणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.