गणेशवाडी – येथील महामार्गावर दुरुस्ती व्हावी यासाठी येथे बस स्थानका समोर शनिवारी सकाळी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दिड किमी पर्यंत वाहनांची कोंडी झाली.
सा बां विभागाचे अभियंता अकोलकर यांनी आंदोलनकर्त्यांना दहा दिवसांत डांबर खडीने खड्डे बुजवु असे लेखी पत्र देऊन आश्वासन दिले.
आंदोलना मधे भा ज प चे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा यांनी सा बां विभाग बद्दल तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली . महामार्गावर अपघातांची,मृतांची काही टार्गेट आहे का? ते पुर्ण झाल्याशिवाय कामाला सुरुवात केली जाणार नाही का? असा संतप्त सवाल केला. महामार्गावरून अधिकारी जात नाही का? त्यांना या दुरावस्था दिसत नाही का? एखादा रुग्ण जर नगरला दवाखान्यात न्यायला आता दिड तास लागतो. तो वाटेतच जातो का अशी भिती कायम असते. हि दुरुस्ती तातडीने करा मागणी केली.

शिवसेना नेवासा विधानसभा संघटक पंकज लांभाते यांनी सा बां विभाग अधिकारी निगरगट्ट आहेत. नागरिकांच्या समस्या त्यांना समजत नाही. देखभाल दुरुस्ती साठी लाखो रुपये खर्च केले. कायम स्वरुपी टिकाऊ काम करा.वाहनांचे अपघात जिव जाणार नाही याची काळजी घ्या. तातडीने कामास सुरुवात करा.तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. कायद्याचा धाक दाखवु नका .नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आलो. फक्त घोडेगाव करांचा प्रश्न नाही .ठोस कार्यवाही करा तरच येथुन ऊठु. अन्यथा गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही .आमच्या भावना लक्षात घ्याव्यात असे म्हणाले.
या सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी थातुर मातुर काम नको.तातडीने कायम स्वरुपी दुरुस्ती करा गोड बोलुन वेळ मारुन नेऊ नका. काम कधी सुरु करणार हे जनतेला सांगा अशी भूमिका घेतली.

यावेळी सा बां विभाग चे अकोलकर यांनी अधीक्षक पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलणे करुन दिले तेव्हा पाटील म्हणाले सेक्रेटरी साहेबांचा दोन दिवस दौरा असल्याने मी आलो नाही. दहा दिवसांच्या अवधीत निविदा काढुन ठेकेदाराकडुन खडी ,डांबरांने खड्डे बुजवले जातील ,पावसात काम करणे शक्य होत नाही. दहा दिवसांच्या आत कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले तसे आशयाचे पत्र ही अकोलकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.