गणेशवाडी – महाराष्ट्रातील श्रद्धास्थळांपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शनिवारी, दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.
यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानाच्या अतिथीगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे औपचारिक स्वागत केले.
राज्य सरकारने दिनांक २२ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार, शनिशिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करत, २०१८ चा देवस्थान व्यवस्थापन कायदा लागू केला असून, त्याअंतर्गत तात्पुरता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पदभार स्वीकाऱ्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला आणि शनी चौथर्यावर जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला योग्य न्याय देण्यासाठी पारदर्शक व भक्ताभिमुख प्रशासन उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, “देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करणार असून, त्यात स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही देखील केली जाईल. प्रशासन भाविकाभिमुख राहील याची खात्री दिली जाईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी भाजपाचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी मागील प्रशासनावर सडकून टीका केली. तर आभार प्रदर्शन मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी केले.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाल्याने, भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पारदर्शक, कार्यक्षम आणि भक्ताभिमुख कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

