गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, लांडेवाडी, खरवंडी, तामसवाडी , सोनई परिसरात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या भागांची अहिल्यानगर चे जिल्हा अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पहाणी करत शेतकऱ्यांशी व मजुरांशी वार्तालाप केला.जवळपास एक महिना होत आला आहे. पाऊस काही उघडकीस देण्याचे नाव घेईना.अनेक ठिकाणी टगफुटी होत पार होत्याच नव्हते केले तर कित्येक जण बेघर झाले.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पालकमंत्री,आमदार साहेब यांचे सुचनेनुसार आपण सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. विशेष करून सोयाबीन, कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे. फळबागां चे देखील नुकसान झाले आहे.आम्ही लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे कसे होतील याचे नियोजन केले असल्याचे या वेळी डॉ.पंकज आशिया यांनी बोलताना सांगितले. या वेळी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे, भाजप चे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा , ऋषीकेश शेटे,माऊली पेचे, बाळासाहेब पवार, किरण जाधव, ललित मोटे,भरत बेल्हेकर, भाऊराव फाटके, गोरख, फाटके, मच्छिंद्र मुंगसे,नवनाथ साळुंके, अशोक टेकणे, तुळशीराम झग्रे, विवेक अंबाडे,राजेंद्र लांडे, प्रमोद घावटे उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

