गणेशवाडी – मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांमध्ये संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, लोहगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे.या स्पर्धांमध्ये शाळेच्या १४ वर्षे वयोगटातीलसंध्या ढेरे: लांब उडी प्रथम, ६०० मीटर धावणे – प्रथम, थाळीफेक – तृतीय, पूजा राशिनकर: ४०० मीटर धावणे – प्रथम, रुद्राक्ष खंडागळे: २०० मीटर धावणे – द्वितीयप्रतीक्षा बोरुडे: २००मीटर धावणे – तृतीय,१७ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी देखील आपली छाप पाडली,.ऋतुजा खंडागळे: ३०००मीटर धावणे – द्वितीयपूजा लाहोरे: २०० मीटर धावणे – प्रथम,

१०० मीटर धावणे – तृतीय, याशिवाय १४वर्षे वयोगटातील १००/४ मीटर रिले स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी संघामध्ये रुद्राक्षा खंडागळे, पूजा राशिनकर,संध्या ढेरे. नायब सय्यद, या सर्व विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाल्याने अभिनंदन होत आहे.या यशाबद्दल मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, मुख्याध्यापक बाबुराव काळे, तसेच क्रीडाशिक्षक विश्वनाथ शिंदे व संपूर्ण शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांना शिक्षकांमध्ये विश्वनाथ शिंदे, अशोक सोनवणे, भगवान विरकर, भगवान आगळे, अमित काळोखे, मीरा चोथे, व श्रीमती निपुंगे यांचे विशेष योगदान लाभले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

