सोनई /शनिशिंगणापूर – नेवासा तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत यश संपादन करून नव्याने रुजू झालेले कार्यलयीन कनिष्ठ लिपिक पदावर संदीप भांड रुजू झाल्याने यांचे स्वागत सन्मान सन्माननीय सहाय्यक निबंधक श्री.. देविदास घोडेचोर व कार्यालयीन स्टाफ च्या वतीने करण्यात आले. श्री भांड हे राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील रहिवासी असून त्यांनी यश संपादन करण्यासाठी अखंडपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. या यश संपादन बद्दल राहुरी व नेवासा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

याप्रसंगी कोणत्याही क्षेत्रात नाव कमवत असताना चिकाटी,परिश्रम व प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा असतो आणि जनसेवेचा आनंद वेगळा असून हे यश संपादन मिळवणे ही एक अभिमानाची बाब असल्याचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी याप्रसंगी उदगार काढले. याप्रसंगी कार्यालयीन अधिकारी श्री योगेश नरसिंगपूरकर, श्री नवनाथ वनवे,श्री जितेंद्र पवार,श्री. एस.एन.ठोंबरे तालुका सचिव श्री. आप्पासाहेब बोर्डे, स्टाफ व्यवस्थापक सुभाष सरोदे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.