नेवासा: नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील शेत जमीन रितसर खरेदी केली आहे. असे असतानाही आमच्या नातेवाईकाला फसवून खरेदी केली, असे म्हणत एका जणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरून तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजी काशिनाथ गडाख (रा. पानसवाडी) यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या पत्नीने पानसवाडी येथे शेत जमीन रीतसर खरेदी घेतली आहे. सदर ऊसाच्या शेतात आम्ही फेरफटका मारण्यासाठी व उसाला पाणी भरण्यासाठी शेताच्या बांधावरून जात असताना तेथे असलेल्या महिला म्हणाल्या की, आमचे नातेवाईक नरेंद्र यांच्याकडून तम्ही ही जमीन फसवन घेतली आहे.

त्यावेळी मी त्यांना म्हणालो की सदरची शेतजमीन आम्ही खरेदी घेतल्यामुळे कसत आहोत, असे म्हणाल्याचा सदर महिलांना राग आल्याने जाई जोगदे यांनी मला लाकडी काठीने पाठीत, शरीरावर मारहाण केली. कपळातून रक्त येईपर्यंत माझी पत्नी अर्चना गडाख यांना हाणमार केलीव मलाही दगडाने मारहाण केली.
सदर महिलेने मला लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच आता तू वाचलास, यापुढे जर आमच्या नादी लागला तर तुला जीवे ठार मारू टाकू असा दम देत निघून गेल्या. या अगोदर ऊस तोडल्याबाबत अभय व आदित्य जोगदे यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती. या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    