गडाख

सोनई – विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख, विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघें, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांचकडे नेवासा तालुक्यात जनतेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते, त्यांचे या मतदार संघात मानणारा वेगवेगळा चाहता वर्ग आहे.ते आता विधानसभेच्या जय पराजय नंतर दीपावलीच्या फराळाचे निमित्ताने व योगायोग असा की, जाहीर होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपालिका, नगरपरिषदाच्या तोंडावर आलेल्या ने एक प्रकारची संपर्क व होवून आलेली भेटण्याची संधी,मिळाली आहे, त्यातून खऱ्या अर्थाने मतदार राजाच्या मनातील कौल नेते मंडळी अजमावून चाचपणी करून नव्या उमेदवारची राजकीय घडामोडीची व उमेदवाराची जुळणी करणार आहे, आणि हे एक राजकीय चाचपनीचे व्यासपीठ बनल्याचे चित्र रंगू लागले आहे. दरम्यान मतदार राजाची गर्दी करू पाहणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीत प्रथमच सामना पाहायला मिळणार आहे, माजी मंत्री शंकररावजी गडाख, आमदार विठ्ठलराव लंघें व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या दीपावलीच्या गोडवा पेरणीनंतर एकमेकांच्या विरोधात भिडणार आहे.असे चित्र दीपावली फराळाच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे व संकेत दिसत आहे.

गडाख

सध्या माजी मंत्री शंकररावजी गडाख यांचे तालुक्यात वर्चस्व पाहता बऱ्याच संस्था गडाख गटाकडे असल्याने त्यांचे पारडे जड आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेना गटाचे आमदार विठ्ठलराव लंघें यांनी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आ. लंघे हे आघाडी घेण्याचे प्रयत्न करू पाहत आहे.शंकराव गडाख यांचा पराभव करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोट धरून तालुक्यात गडाखांच्या विरोधात विकसित स्पर्धेला विकसित आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक वर्षाच्या कालखंडानंतर माजी मंत्री गडाख यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला असून, आमदार लंघें विकासाच्या माध्यमातून जनसंपर्कात दिसत आहे. आणि माजी आमदार मुरकुटे हे जनतेच्या व राजकीय क्षेत्रात कुठल्याही संपर्कात नसल्याने त्यांचे सध्या तरी शांत दिसतात. जसजश्या निवडणुका डिक्लेअर होतील तसतसे कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश, नंतर उमेदवारी,नंतर रणधुमाळीतील सामना सुरू होणार आहे यामध्ये महिला आघाडीची एन्ट्री महत्त्वाची ठरणार आहे.

गडाख

नेवासा तालुक्यात धर्माचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालू असल्याने नेतेमंडळी कार्यकर्ते मतदार राजा संभ्रम अवस्थेत असून,, उमेदवारी मिळणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठा, प्रतिमा, यावर गणिते आजमावूनच उमेदवार विजयी होणार हे निश्चित असणार आहे.तिकिटासाठी महिला वर्गाची खेळी प्रत्येक पक्षाकडून होणार आहे, त्यामुळे तिन्ही नेते मंडळी दीपावलीच्या फराळाच्या निमित्ताने मतदार राजाचा उत्साह मनाचा ठाव त्यांचे विचार आजमावून घेऊनच एकमेकांशी भिडणार आणि हा सामना नागरिकाला पाहायला मिळणार यात शंकाच नाही.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे भावी सदस्य होण्यासाठी रस्सीखेस चालू असून भाऊंगर्दी होणार आहे, योग्य वेळी, योग्य उमेदवार देऊन हे सर्व पाहता पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. तसेच महायुतीकडे सर्वाधिक उमेदवाराची मागणी होताना दिसत असून त्याखालोखाल माजी आ. मुरकुटे असून महायुतीचे उमेदवार देण्यासाठी तालुक्यातील राजकीय परिस्थितीची माहिती, विकासाचा दृष्टीने, समाजासाठी वेळ देणारा, सेवाकार्य, गरीबाच्या हितासाठी काम करणारा, आदी निकाशाचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार असून उमेदवारसाठी भाऊंगर्दी असताना महायुतीचे पक्षासाठी निर्णय घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायतिच्या निवडणूकिला सामोरे जाणार असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी संगितले.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *