शिंगणापूर

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथे भाविकांना लटकुंची साडेसाती कायम असल्याचे पहावयास मिळते. एक वेळ शनीच्या साडेसाती चा फेरा परवडेल परंतु यांचा नको.भाविकांच्या वाहनांचा आपल्या दुचाकीवरून पाठलाग करत त्यांना आपली दुचाकी आडवी लावत आपल्याच दुकानात पुजा ताट घेण्यासाठी आग्रह करत असतात. तसे न केल्यास लटकु त्यांना वेळप्रसंगी मारहाण देखील करत असतात. हा सर्व काही प्रकार पोलीस ठाण्या समोरच घडत असतो . कधीही ड्रेस कोड वरती नसणारा हा पोलीस दादा मात्र बघ्यांची भुमिका मात्र व्यवस्थीत बजावत असतो.

शिंगणापूर

अनेकदा स्थानिकां बरोबर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांवर देखील जिव घेणा हल्ला झालेला आहे. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकदा गाव बंद ठेवुन निवेदन दिले तरी देखील पोलीस या मध्ये अपयशी ठरले. त्यांच्या या अपयशाचे कारण म्हणजे त्यांना मिळणारा मलीदा असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. तरी या मध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून भाविकांना या साडेसाती मधुन बाहेर काढावे.तसेच लटकुंना पाठबळ देणाऱ्या या पोलीस दादा च्या जागी एखादा खमक्या अधिकारी नेमुन या सर्वांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.

शिंगणापूर
शिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगणापूर
शिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!