रस्ते सुरक्षा

श्रीरामपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे रस्ते सुरक्षा अभियान २०२६ कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे जिल्हा न्यायाधीश माननीय श्री. सिद्धार्थ साळवी हे होते. प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉ. पंकज आशिया, नगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विनोद सगरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी श्री. किरण सावंत पाटील, पोलीस उपाधीक्षक श्री. जयदत्त भवर, तहसीलदार श्री. मिलिंद कुमार वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्ते सुरक्षा

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनंता जोशी, सहाय्यक परिवहन अधिकारी श्री. संदीप निमसे, पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख, विविध वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने मोटारसायकल चालवताना हेल्मेटच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी श्रीरामपूर शहरातून हेल्मेटयुक्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ४०० मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.

रस्ते सुरक्षा

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रस्ते सुरक्षा विषयक चार महत्त्वाचे घटक — रस्ते व वाहतूक अभियांत्रिकी, जनप्रबोधन, कायद्याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्था — यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अहिल्यानगर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीमार्फत अपघात कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्स निर्मूलनासाठी पोलीस व आरटीओ विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबतही त्यांनी माहिती दिली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनंता जोशी यांनी नागरिकांनी केवळ जबाबदार नागरिक नव्हे तर जबाबदार रस्ते वापरकर्ते बनावे, असे आवाहन केले. रस्ते सुरक्षा संस्कृती अंगीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच अभियानादरम्यान कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

रस्ते सुरक्षा

कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदीप निमसे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभिनव रस्ते सुरक्षा उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमास बाईक रायडर ग्रुप, मोठ्या संख्येने नागरिक, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, मोटार वाहन वितरक, तालुका वकील संघ तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ते सुरक्षा
रस्ते सुरक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ते सुरक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!