पाचेगाव फाटा – नेवासा श्रीरामपूर या रस्त्यावरून जात असताना आपल्या खिशातील महागडा मोबाइल पडला आणि तो फोन सापडल्याने मोबाइल धारकांनी त्या तरुण मुलांला बक्षीस देत कौतुकास्पद कामगिरी मुळे शाबासकीची थाप मारण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की,श्रीरामपूर येथील मोरगे वस्ती वरील लॅब टेकींशनल महेश शेळके हे काही कामानिमित्ताने गंगापूर येथे गेले होते,सकाळी गंगापूर येथून येत असताना त्यांना नेवासा तालुक्यातील एस कॉर्नर जवळ फोन आला असता त्यांनी फोन घेऊन आपल्या पँटच्या खिश्यात घातला असता तो अर्धवट गेल्याने तो बेलपिंपळगाव फाट्याजवळ खिशातून आय ३ प्रो मॅक्स साठ हजार किमतीचा मोबाईल फोन पडला.टाकळीभान (ता श्रीरामपूर) येथे गेल्यानंतर लक्षता आले की आपला मोबाईल पडला.

त्यानंतर मोबाईल शोधाशोध सुरू झाली,महागडा मोबाइल पडल्याने फोन उचलता नसल्याने नातेवाईक व मित्रपरिवाराला काही अनुसूचित प्रकार घडला काय?असा प्रश्न निर्माण झाला होता. महेश शेळके हे टाकळीभान येथून नेवास्याकडे परत मोबाइल शोधण्यासाठी गेले,त्यानी नेवासा पोलीस ठाण्यात आपला मोबाइल या रस्त्यावर गहाळ झाला आहे असे सांगितले.पोलिसांनी सांगितले एक तास थांब आपण मोबाईल लोकेशन चेक करू असे सांगितले नंतर त्यानी पुन्हा शोधाशोध पुन्हा सुरू केला.
पण पाचेगाव येथील ऋषिकेश पडूंरे हा तरुण रोज बेलपिंपळगाव फाट्यावर ताजे फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो.त्याच्या काही अंतरावर मोबाईल पडलेल्या अवस्थेत आढळून आला.फोन हातात घेतल्यानंतर लगेच त्यावर फोन आला व त्यानी तो फोन घेत तुम्हा कोणाचा फोन मला सापडला आहे.तो फोन बेलपिंपळगाव फाट्यावर आहे.स्वतःहून या व ओळख पटवून मोबाईल घेऊन जा.महागडा मोबाईल फोन मिळण्यानंतर जागे वर एक लिटर पाणी पिऊन शेळके यांचा जीव भांड्यात पडला.

सापडलेला महागडा मोबाईल परत करणे हे प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण आहे आणि असे अनेकदा घडले आहे, जिथे प्रामाणिक व्यक्तींनी (विद्यार्थी, मजूर, सामान्य नागरिक) महागडे फोन परत केले आहेत, ज्याचे कौतुक झाले असून त्यांना बक्षिसेही मिळाली आहेत; ही गोष्ट समाजातील चांगल्या मूल्यांचे दर्शन घडवते.
या घटना दर्शवतात की कितीही महागडा मोबाईल असला तरी प्रामाणिकपणा दाखवून तो परत देण्याची भावना समाजात अजूनही जिवंत आहे.
सापडलेला मोबाईल परत करत प्रामाणिकपणा दाखवला. त्याबद्दल त्या ऋषिकेश मुलांचे ठिकठिकाणी कौतुक केले जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

