आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
डंपर

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बुधवारी सायंकाळी पाच सुमारास पाचेगाव फाट्याकडून पाचेगाव दिशेने येणाऱ्या डंपर चा पाठलाग करून डंपर पाचेगाव येथील अर्ध्या रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी धरला.त्यात येणारे जाणारे काहीजण नागरिक म्हणाले की, डंपर खाली होता तर काहीचे म्हणणे आले की डंपर मध्ये काहीतरी होते.पण होते की नाही या गोष्टीचा उलगडा तर झालाच नाही शिवाय त्यावर काही कारवाई झाली की नाही हे देखील समजू शकले नाही.

हे भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारे एक प्रमुख सरकारी खाते आहे, जे वाहनांची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) देणे, रस्ते कराची वसुली करणे आणि मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामे या खात्याकडून केली जाते.पण त्यात काहिक वेळ चोर सोडून संन्यासीला फाशी या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देखील होताना नागरिक व्यक्त करीत आहे.

डंपर

पाचेगाव परिसरात वाळू आहे,त्यात रात्री वाळू देखील बाहेर जात असल्याचे गावातील नागरिक कुजबुज करीत आहे.पण वाळू वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर तर खड्डे केले,मग वाळू जाती कुठून?हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दिवसाढवळ्या तर अवैध वाहतूक करीत नाही पण रात्री मात्र राजरोसपणे तर अवैध वाहतूक जोमाने सुरू होती.जसे दिवस प्रादेशिक परिवहन भर रस्त्यावर अवैध वाहतूक रोखण्यासाठी सज्ज आहेत तसे रात्री चालणाऱ्या अवैध वाहतूक रोखण्यासाठी देखील गस्त घालण्याची गरज या भागात दिसून येत आहे.

डंपर

सध्या मार्च एन्ड असल्याकारणाने प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्त्यावर गस्त घालत आहे,त्यात विना परवाना,विमा संपल्याले वाहने,वाहन क्रमांक याच बरोबर अवैध धंदे वाहतूक करणारे वाहन आदी गोष्टीला आळा घालण्यासाठी मदत होत असली तरी या कारवाई दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

डंपर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

डंपर
डंपर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

डंपर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!