आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्वामी समर्थ

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महंत रामगिरी महाराज (सरालाबेट) यांच्या कीर्तन सेवेने वातावरण भक्तिमय झाले.

कीर्तनात निरूपण करताना महाराज म्हणाले, “बेळपिंपळगाव येथे स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं; त्या रोपट्याचा वेल आज गगनावर गेला आहे. बेळपिंपळगाव आज प्रतिअक्कलकोट झाले आहे.” त्यांनी मंदिरात प्रत्येक गुरुवारी सुरू असलेल्या अखंड अन्नदान सेवेचे विशेष कौतुक केले. ही सेवा गावाच्या दातृत्वशील वृत्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या संख्येने गावातील तरुण एकत्र येऊन अध्यात्मिक सेवा करतात, ही बाब भूषणावह असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावाच्या वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पाहून महाराजांनी समाधान व्यक्त केले. “बेळपिंपळगावात शक्ती आणि भक्ती एकत्र नांदत आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते ७या वेळेत लघुरुद्र अभिषेक, सकाळी ७:३० ते ८ या वेळेत महाआरती संपन्न झाली. दुपारी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी कार्यक्रमास भेट देऊन भाविकांना प्रबोधन केले. पालखी सोहळ्यानंतर स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच दुपारी १ ते ३ या वेळेत गणेश महाराज करंजकर (भगूर) यांची स्वामी समर्थ चरित्र कथा पार पडली. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभरात सुमारे ३० ते ३५ हजार भाविकांनी या सोहळ्यास भेट आनंद घेतला.
सर्व जाती-धर्मातील तरुण एकत्र येऊन स्वामीकार्य करीत असल्याबद्दल भास्करगिरी महाराजांनी विशेष कौतुक केले.

स्वामी समर्थ

या स्वामींच्या मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने बेलपिंपळगाव गाव पूर्ण भक्तिमय पाहायला मिळाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेळपिंपळगाव स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. महाप्रसाद वाटपाचे नियोजनबद्ध कार्य सर्व सेवेकऱ्यांनी पार पाडले.

अखंड दर गुरुवारी चालणाऱ्या अन्नदानाच्या पंगती पुढील वीस वर्ष बुक..
या बेलपिंपळगाव येथील श्री स्वामींच्या दरबारी दर गुरुवारी होणारे अन्नदान हे पाहता पाहता २०४६ पर्यन्त अन्नदानाच्या पंगती बुक झाल्याने हे अन्नदान सर्वश्रेष्ठ दानाची प्रचिती या गावातून पहायला मिळाल्याने सर्व महंतानी अन्नदान करणाऱ्या भाविकांची कौतुक केले.

स्वामी समर्थ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वामी समर्थ
स्वामी समर्थ
स्वामी समर्थ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वामी समर्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!