घोडेगाव – पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुधवारी सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी सोनई , घोडेगाव, चांदा येथील पत्रकारांचा शाल ,श्रीफळ,पुष्प गुच्छ, महात्मा फुलेंचा चरित्र ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कांदा खबरदार व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक येळवंडे होते. तर उद्योजक सुजित चोरडिया, शरद सोनवणे, सुधीर वैरागर प्रमुख पाहुणे होते.
महात्मा फुले बाल संगोपन केंद्र अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी कार्यक्रमास उपस्थित असणा-या पत्रकार व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक मधे संस्थेचा परिचय करुन दिला. संस्थेच्या अडचणीच्या काळात पत्रकार बांधवानी केलेल्या मदतीचा उल्लेख केला.

पत्रकार हा लोकशाहिचा चौथा स्तंभ आहे. निर्भिडपणे लेखणी चालते तेव्हा सामाजिक न्याय परिस्थिती समोतोल साधला जातो असा महत्वपूर्ण उल्लेख करुन कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक येळवंडे म्हणाले तालुक्यातील पत्रकारांची लेखणी नेहमी तळपत असते. न्याय बाजु मांडण्याचे काम सतत करत असतात. यातुन अनेक प्रश्न वर्तमान पत्रात मांडले गेले . त्यातुनच समाजातील अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली.
शरद सोनवणे यांनी पत्रकार हा समाजाचा आधार स्तंभ आहे. असे म्हटले. तर सुधीर वैराग्य यांनी वंचीत बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण पत्रकारांना आहे. ते पोटतिडकीने आमची बाजु मांडतात आम्हाला त्यांचा आधार आहे. अनेक अन्याय ,अत्याचार वृत्तपत्रात मांडले गेल्याने वंचित बहुजन समाजाला न्याय हक्कासाठी पत्रकार खंबिर पणे उभा होता आणि आहे.

या कार्यक्रमात सोनई प्रेस क्लब चे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र शेटे, उपाध्यक्ष संतोष टेमकर, सचिव संदिप कुसळकर , दिलीप शिंदे, संजय वाघ, राजेंद्र लाटे . देविदास चौरे, अशोक भुसारी, गणेश बेल्हेकर, सुरेश दारकुंडे, संभाजी शिंदे , अविनाश येळवंडे , किशोर दरंदले उपस्थित होते.
महात्मा फुले बाल संगोपन केंद्र येथे अनाथ,गोरं गरिबांची एकर पालकांची पाल्य शिक्षणासाठी वस्तीगृहात आहे. संस्थेचे अध्यक्ष भटक्या समाजाचे आहेत. परंतु मुलांनी शिकलं पाहिजे या आत्यतीक ओढीनं स्वतः भिक्षा मागून या मुलांना राहण्याची व्यवस्था,जेवण,शैक्षणीक मदत , कपडे,वह्या पुस्तकांसह सर्व पुरवतात. अडचणही पाचवीलाच पुजलेली अशाही अवस्थेत घोडेगाव,सोनई,चांदा येथील पत्रकार बांधवांचा त्यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून केलेला सन्मान हा कोणत्याही सन्माना पेक्षा निश्चित मोठा आणखी कायम लक्षात राहिल असे दिलीप शिंदे यांनी सर्व सत्काराला उत्तर देत संस्था अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांचे सर्व पत्रकारांच्या वतिने आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

