घोडेगाव : बेल्हेकरवाडी परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. अमोल आण्णासाहेब पवार (वय ३२, रा. बेल्हेकरवाडी, सोनई, ता. नेवासा), असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत बाबासाहेब शंकर बेल्हेकर (वय ४९, व्यवसाय शेती, रा. बेल्हेकरवाडी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (दि. २४) जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास अमोल पवार याने आपल्या राहत्या घरात मफलरच्या साहाय्याने घराच्या छताला असलेल्या पंख्याला गळफास घेतला. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

