
नेवासा- महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणी संदर्भात संदर्भात विविध कारणे दिले जातात. अशा पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत मार्गदर्शक अनुकरणीय व आदर्श मार्ग चोखाळला आहे. नदी जोड प्रकल्प आणि तुटीच्या नदी खोऱ्यांच्या साठी केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्री नामदार पाटील साहेब यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे.

केंद्र सरकारकडे विविध खात्यासाठी भरघोस निधी उपलब्ध असतो तथापि त्यासाठी अभ्यास व तांत्रिक दृष्टीने मजबूत पाया असलेली प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे साहेब यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचा दुष्काळ हटविण्यासाठी केंद्रातील जलशक्ती मंत्रालया कडे चांगले प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या सक्षम सादर करून महाराष्ट्राला कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे अहिल्यानगर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






