
नेवासा – शहराचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक व पारंपरिक मोहिनीराज यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. नेवासा हे विष्णूच्या मोहिनी अवताराचे एकमेव मंदिर असलेले गाव असून, ग्रामदैवत मोहिनीराजांची पंधरा दिवसांची यात्रा २१ जानेवारीपासून रथ सप्तमीपासून सुरू होत आहे.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रथमच शासकीय पातळीवर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी योग्य आयोजन केल्याने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार विठ्ठलराव लंघे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, यात्रा समिती ज्येष्ठ कार्यकर्ते संजय सुखदान, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रा काळात सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवावा, नगरपालिकेने पालखी मार्गासह शहरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, तसेच महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. शहरातील सर्व ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत, भाविकांसाठी मोबाईल शौचालयांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मंदिर परिसरात व गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा, तात्पुरती पोलीस चौकी उभारावी, झेंडा मिरवणूक सायंकाळी सात वाजेपर्यंत संपवावी आणि मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर टाळावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेत अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन देतानाच, सर्व खात्यांच्या प्रशासनाने या सूचनांनुसार यात्रा काळात सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी केले.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी सर्वतोपरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे सांगून भाविकांनी गर्दी नियंत्रण व मिरवणूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान, संतोष गव्हाणे, देवस्थान समितीचे विश्वस्त जयेश बडवे जयाकाका देवचक्के डॉक्टर प्रणव जोशी निरंजन डहाळे महेश मापारी, शिवा राजगिरे, स्वप्निल मापारी अनिल शिंदे, जयदीप जामदार, संभाजी धोत्रे, रमेश शिंदे आणि गुरुप्रसाद देशपांडे आधी समिती सदस्यांनी यांनी मौल्यवान सूचना मांडल्या. दरम्यान, शांतता समिती व प्रशासनातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







