यशवंत

नेवासा – तालुक्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली यशवंत टॅलेंट सर्च परीक्षा शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धा परीक्षेसाठी नेवासा तालुक्यातील एकूण ४३ माध्यमिक शाळांमधील ३२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.मा. खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ निवेदिता गडाख यांच्या संकल्पनेतून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

यशवंत

यश अकॅडमी, सोनईचे प्राचार्य श्री. शैलेश दरेकर सर व ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल, नेवासा येथील प्राचार्य श्री. वैभव आढाव सर यांच्या नियोजनातून तसेच ८२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होणे, सीबीएसई व महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या एसएससी परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणे, विषयांमध्ये प्राविण्य मिळवणे व उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा देणे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मुळा एज्युकेशन सोसायटीकडून पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे, हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत मोलाचा ठरल्याचे मत सहभागी शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनांचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी सहभाग व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

यशवंत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशवंत
यशवंत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशवंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!