प्रवरा

नेवासा – ग्रामदैवत भगवान श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सवानिमित्त अमृतवाहिनी प्रवरामाईच्या महाआरतीचा सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. गुरुवर्य राष्ट्रसंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने गणपती घाटावर जणू हरिद्वारच्या गंगा आरतीचा भास निर्माण केला होता. ‘अमृतवाहिनी प्रवरामाता की जय’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, तर दीपोत्सवाने प्रवरामाईचे पात्र उजळून निघाले.

प्रवरा

नेवासा येथील गणपती घाटावर श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे उद्धवजी महाराज मंडलिक, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज, ज्ञानेश्वरजी महाराज (रामकृष्ण विवेकानंद आश्रम), श्री विश्वनाथजी महाराज (घोगरगाव आश्रम), गहिनीनाथ महाराज आढाव, धनंजय मुनी महाराज, बाळू महाराज कानडे, हरी महाराज भोगे, तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या हस्ते प्रवरामाईला मानाची साडी-चोळी अर्पण करण्यात आली.

प्रवरा

नाशिक येथील गंगा-गोदावरी पंचकोटी आरती समूहातील आचार्य वेदमूर्ती अमित पंचभैय्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महाआरतीचे नेटके नियोजन केले होते. संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते महाआरती होताच फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि तोफांची सलामी देण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वे.शा.सं. निखिलगुरू जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी प्रवरा नदीचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले. तबलावादक कृष्णा कुलकर्णी यांनी भजनाला उत्कृष्ट साथ दिली. सोहळ्याला बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, अॅहड. संजय सुखदान, मोहिनीराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष जयेश बडवे, बाळासाहेब पाटील, रविंद्र जोशी, जयवंत देवचक्के उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अभिजित बडवे, मयूर जोशी, लक्ष्मीकांत जोशी यांनी परिश्रम घेतले, तर अॅड. मयूर वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रवरा
प्रवरा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रवरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!