घोडेगाव : नेवासा तालुक्यातील चांदा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर सोनई पोलिसांनी छापा टाकुन नुकतीच कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतीक इसाक शेख (वय २७, रा. चांदा) हा गावतील नदीपात्रात असणाऱ्या एका टपरी मध्ये अवैधपणे दारूची विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकुन त्या ठिकाणाहून देशी – विदेशी कंपन्यांच्या १८०० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

दुसरीकडे गावातील नदीपात्रातील टपरी मध्ये अशोक अंबादास भडके (वय ३२) हा देशी-विदेशी कंपन्या असलेल्या दारू विक्री करत असताना पोलिसांना मिळुन आला. यावेळी ९८० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. चांदा ते मिरी रोडवर शिवाजी दशरथ आढाव (वय ४५) हा विनापरवाना तयार गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना पोलिसांना आढळुन आला.

यावेळी सुमारे २००० रुपये किंमतीची २० लिटर तयार दारू, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभिषेक गोरख दहातोंडे (वय २५) हा आपल्या राहत्या घरामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत होता. याप्रसंगी १५०० रुपये किंमतीची १५ लिटर तयार गावठी दारू, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

