
भेंडा- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयात कथा काव्य लेखन वाचन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तसेच नवोदित कवी लेखक यांनी या कार्य भाग शाळेत सहभाग घ्यावा असे आवाहन नेवासा तालुका शब्दगंध चे शाखाप्रमुख प्रा. डॉ किशोर धनवटे व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे.

याप्रसंगी पांडुरंग रोडगे दिगंबर गोंधळी प्रा दिगंबर सोनवणे संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे याप्रसंगी प्रथम सत्रात जिजामाता महाविद्यालयाचे मराठी भाषा शब्दप्रभू प्राचार्य डॉक्टर शिरीष लांडगे यांचे कथा काव्य रचने संदर्भात अमोल मार्गदर्शन होणार आहे.

तसेच दुपारच्या सत्रात काव्यवाचन होणार आहे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र उदागे संस्थापक सचिव सुनील गोसावी कार्याध्यक्ष डॉ प्रा अशोक कानडे सन्माननीय मार्गदर्शक पांडुळे व इतर मान्यवर मोलाचे सहकार्य व सहयोग देणार आहेत काव्यवाचन व लिखित साहित्य संयोजकाकडे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

