गुन्हा

नेवासा- करजगाव येथे विनापरवाना बेकायदा दारू विक्रीबर सोनई पोलिसांनी छापा टाकून सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

करजगाव येथील हॉटेल सावलीच्या पाठीमागील बाजूस १२०० रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या १५ सीलबंद बाटल्या, ८०० रु किमतीच्या वॉल्कन ब्लू कंपनीच्या ५ सीलबंद
बाटल्या, ८८० रु किमतीच्या ब्ल्यू व्हिस्की कंपनीच्या ४ सीलबंद बाटल्या, ११५० रुपये किमतीच्या आयकॉनिक व्हाईट कंपनीच्या ५. सीलबंद बाटल्या, १२५० रुपये किमतीच्या रॉयल टेक कंपनीच्या ५ सीलबंद बाटल्या, ९०० रुपये किमतीच्या अंबर फाईन विस्कीच्या ६ सिलबंद बाटल्या व १ हजार रुपये किमतीच्या बी सेवन कंपनीच्या ४ सिलबंद बाटल्या असा एकूण ७१८०.
रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलीस कॉन्स्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून किशोर बाळासाहेब शिरसाठ रा. करजगाव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. डी. लवांडे करत आहेत.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!