घोडेगाव- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शेतीवाटपाच्या विषयावरून वृध्दास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी खंडु मारुती कदम(वय.६३) रा. कदम वस्ती घोडेगाव हे आपल्या शेती गट नंबर ५१६ मधील बांधावर असणारे चिंचेचे झाडे झोडण्याच्या कारणावरून आरोपी अशोक दशरथ बऱ्हाटे, प्रदीप हरिभाऊ कदम, ज्ञानदेव अशोक बऱ्हाटे, मुक्ता सिताराम कदम यांनी फिर्यादिस काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. परत जर चिंचेच्या झाडाबाबतीत व शेतीवाटपाच्या विषयावर आम्हाला काही बोलले तर जिवे ठार मारून टाकु अशी धमकी दिली असल्याचे दि. १४ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र. नं. ५२/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

