आपला जिल्हा – शेवगाव तालुक्यातील जागृत देवस्थान श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यावर्षी महाशिवरात्री निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातून पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री संगमेश्वराचे दर्शन घेतले सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पंचक्रोशीतील व नव स्फूर्ती निमित्त भाविक भक्तांनी श्री संगमेश्वराला महादेवाला अभिषेक करण्यात आला व त्यानंतर सकाळचे किर्तन ह भ प निलेश महाराज वाणी वैष्णव सेवा आश्रम बऱ्हाणपूर यांचे कीर्तन झाले व संध्याकाळचे कीर्तन ह भ प राम महाराज उदागे सुसरे यांचे कीर्तन झाले.

या कीर्तनाला तालुक्यातून पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त उपस्थित होते महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान वर दिवसभर उपवास निमित्त खिचडी, केळी उपवासाची पदार्थ भाविक भक्तांनी श्री संगमेश्वराच्या चरणी अर्पण करून भक्तांना प्रसाद हा दिवसभर देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अस्तित्व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले सहकार्य लाभले महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान वर भजनी मंडळींनी शिवनामाचा जप काही महिला मंडळी यांनी शिवलीलामृत पारायण तर काहींनी संगीत भजनाचे कार्यक्रम देवस्थान वर केले.

तसेच उद्या दिनांक सोमवार 16.2.2026 रोजी 10 ते 12 ह भ प उद्धव महाराज सबलस वुडलेकर यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होणार असून किर्तन झाल्यानंतर श्री नवनाथ गोविंद निकाळजे शेवगाव यांची महाप्रसाद भंडाऱ्याची पंगत होणार आहे तरी सर्व पंचक्रोशीतील व शेवगाव तालुक्यातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा मनीषा अमोल बुचकुल व संगमेश्वर देवस्थान सप्ताह पंच कमिटी भजनी मंडळी व संगमेश्वर देवस्थान विकास समिती यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

