आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भास्करगिरी

देवगड फाटा – तालुक्यातील क्षेत्र देवगड येथील गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच देवगड संस्थानच्या ज्ञानसागर सभा मंडपामध्ये महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत नांगरे यांनी स्वागत करून भास्करगिरी महाराज यांचे संतपूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महंत भास्करगिरी महाराज यांनी विद्याथ्यर्थ्यांना खूप अभ्यास करा, अभ्यासाची ओढ निर्माण करा, जिद्द व चिकाटी अंगिकारून जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करा, आपल्या आईवडीलांचे स्वप्न अभ्यास करण्याचा व जीवनात यश पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगा असे सांगून विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे संपादन करण्याचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत परीक्षांसाठी तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी गुरुर्व्य भास्करगिरी महाराज व शिक्षकांचे दर्शन घेतले भावपूर्ण वातावरणात निरोप समारंभाचा समारोप करण्यात आला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भास्करगिरी
भास्करगिरी
भास्करगिरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भास्करगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!