
भालगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळाची सुविधायुक्त मैदाने, खेळ साहित्य उपलब्ध झाल्यास खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन सरपंच मंगल खरात यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत भालगाव शाळेसाठी खो-खो मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब आहेर, दादासाहेब खरात, चेअरमन युवराज तनपुरे, व्हाइस चेअरमन अविनाश राशीनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश तनपुरे, उपाध्यक्ष स्वाती खरात, पोपेट खरात, ग्रामविकास अधिकारी वैशाली सानप उपस्थित होते.

प्रास्ताविक शिक्षक राहुल आठरे यांनी केले. यावेळी मैदानासाठी योगदान देणाऱ्या माऊली उद्योग समूहाचे प्रमोद भागवत, ज्ञानेश्वर भागवत, पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत, दादासाहेब खरात आदींच्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सरस्वती लोंढे, जनाबाई जाधव, शीतल झरेकर, पल्लवी तरवडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. आभार अमोल तुपे यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

