सुंदर शाळा
सुंदर शाळा

नेवासा : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.शासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अंतर्गत राबविण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेने सहभाग घेतला होता.

सुंदर शाळा

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन,अध्यापन,प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयतिक स्वच्छता,चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न,अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास आदी अशा अनेक विविध घटक व उद्दिष्टांवर शाळेने काम केले.तालुक्यातील २५१ शाळांचे मूल्यांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

सुंदर शाळा

यामध्ये तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा नेवासा मुली शाळेने पटकविला. नेवासा पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी संजय लखवाल,नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल फराटे, गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, घोडेगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र देसरडा यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा नेवासा मुली शाळेचे मुख्याध्यापक अरविंद घोडके,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा पठाडे,उपाध्यक्षा अनिता डोकडे, भावना चव्हाण,शिक्षक शरद मचे,विठ्ठल कांगुणे,प्रतिभा पालकर,सुनीता वणे,ज्योती बोरुडे,वर्षा जगताप,वैशाली कुलट,व्यवस्थापन समितीचे सचिन गव्हाणे, शाम डोकडे, गौरव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

सुंदर शाळा

यावेळी विस्ताराधिकारी मिरा केदार,रुक्साना शेख, केंद्र प्रमुख संजय शेळके,रवींद्र कडू, बाळासाहेब काशिद,कमल लाटे,विषय शिक्षक सामी शेख उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुंदर शाळा
सुंदर शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुंदर शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!