
नेवासा – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाने भानसहिवरे येथील शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत कुसुमाग्रज बालवाचनालय व शिक्षक वाचनालयाचे उद्घाटन भानसहिवरे गावचे माजी सरपंच अशोक बोरा यांच्या हस्ते व नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील, चेअरमन बाबासाहेब ढवान, उपसरपंच दत्तात्रय काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. संतोष ढवान, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गणेश मुनोत, मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

उदघाटनापूर्वी सकाळी गावातून ढोलताशांच्या गजरात पालखीसह भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शिक्षिका आशा गवळी व वर्षाताई कुऱ्हाडे यांनी तयार केलेली सुंदर पुस्तक पालखी उपस्थितांची लक्ष्य वेधून घेत होती. बालवाचनालयासाठी किशोर जोजार व पंडित हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी विल्सन वंजारे यांनी दिलेल्या देणगीतून पुस्तके खरेदी करण्यात आली.

पसभापती किशोर जोजार यांनी फर्निचर देण्याचे जाहीर केले. सरपंच मीना जोजार व ग्रामअधिकारी दादासाहेब काळे, शिक्षक अशोक ढोले यांनी पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमास नंदकुमार जाधव, संदीप तळपे, डॉ. सचिन साळुंके, डॉ. अशोक भोईटे, विल्सन वंजारे, श्रीकांत काळे, प्रवीण जाधव, सुनिल रणशिंगउपस्थित होते. आभार महेश देवतरसे यांनी मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

