आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
त्रिवेणीश्वर

नेवासा : महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर-हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे “हर हर महादेव “चा गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्रम्हलिन भक्त प्रल्हाद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी निघालेल्या पालखी मिरवणुकीचे तोफांची सलामी देत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महाशिवरात्रीला पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात त्रिवेणीश्वर शिवलिंगास महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला.

त्रिवेणीश्वर

यावेळी दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा व भक्त परिवारातील सदस्यांचा महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्रिवेणीश्वर भक्त मंडळाचे सर्व सेवेकरी हे तनमन धनाने याठिकाणी सेवा देऊन स्वयंसेवकाची भूमिका बजवतांना दिसत होते.

भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या सभामंडपात दर्शन बारी तयार करण्यात आली होती. दर्शन बारी रांगेत सर्व भक्त हे शिस्तीचे पालन करत दर्शन घेतांना दिसत होते. दर्शन नियोजन व प्रसाद वाटप नियोजनासाठी हंडीनिमगाव व सुरेशनगर येथील तरुण मंडळांच्या सदस्यांनी व भक्त मंडळातील युवकांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली. महाशिवरात्री निमित्ताने आलेल्या भाविकांचे महंत रमेशानंदगिरीजी महाराजांनी हसतमुखाने स्वागत केले. त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात असलेल्या महान तपस्वी ब्रम्हलिन भक्त प्रल्हाद महाराजांचे समाधी मंदिर, हनुमान मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर येथे ही भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर सर्व भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपात सकाळी ९ ते १२ शिवशाहीर नानासाहेब कोलते सर व सहकारी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला, दुपारी १२ ते २ यावेळेत जिल्हा परिषद शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दुपारी ३ ते ५ यावेळेत सद‌गुरू कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक यांचे शिव महिमा यावर हरिकीर्तन झाले या किर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात मुख्य प्रवेशडरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई व गणेश मूर्तीजवळ उभारण्यात आलेला कारंजा आरास देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

त्रिवेणीश्वर
त्रिवेणीश्वर
त्रिवेणीश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

त्रिवेणीश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!