
नेवासा – सुरेगाव (गंगा) येथील जिल्हा परिषद शाळेत १४ फेब्रुवारी रोजी ज्ञान, संरकार आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शाळेमध्ये ‘कुसुमाग्रज बालवाचनालय’ आणि शिक्षक वायनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.

नूतन गटशिक्षणाधिकारी साहित्यिक संजय कळमकर, शिक्षण विस्ताराधिकारी रुकसाना शेख आणि केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वाचनालयाचे उद्घाटन प्रा. रमेश शिंदे यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून काइस चेअरमन रामभाऊ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भजनी मंडळाच्या मंगल स्वरांनी झाली.

तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता या ग्रंथांची रथातून वीणा, टाळ, मृदुंगाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी ग्रेवांचे पूजन केले. शाळेतील विद्याथ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून डोक्यावर पुस्तके घेत प्रभातफेरी काढली. साठे मॅडम यांनी काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. हराळ सर, जासूद सर आणि गजभिये सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. दिंडीचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव यांनी ‘वाचाल तर वाचाल या संदेशातून वाचनाचे महत्व अधोरेखित केले. शाळा समिती अध्यक्ष अंकुशराव शिंदे यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. रवींद्र भालेराव यांनी वाचनाने आयुष्य कसे घडते याची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात प्रा. शिंदे यांनी आई, शाळा आणि ग्रंथ हेच संस्कारांचे उगमस्थान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली. वाचनालयासाठी २२,००० रुपये शिल्लक असून, मुख्याध्यापकांनी यादी दिल्यास स्वतः पुस्तके आणून देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील वाचनाचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास भजनी मंडळाचे बाळासाहेच शिंदे, आप्पासाहेव शिदि, सुनील शिंदे, गुरुदेव शिंदे, नितीन शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ताके सर यांनी आभार मानले.
वाचनाने घडते आयुष्य
आई, शाळा आणि ग्रंथ हेच संस्कारांचे उगमस्थान आहेत. विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लागल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. – प्रा. रमेश शिंदे, उद्घाटक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

