वाचनालय
वाचनालय

नेवासा – कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल वाचनालय’ सुरू करण्यात आले असून, विद्याथ्यांवर वाचनाचे संस्कार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मोबाईल बंद ठेवून वाचनासाठी वेळ द्यावा, असे आवाहन शिक्षण विस्ताराधिकारी रुकसाना शेख यांनी केले.

वाचनालय

शाळेत आयोजित कार्यक्रमात रुकसाना शेख यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, उद्योजक स्वप्नील मगर, पालक गोविंद व्यवहारे, इंजिनिअर धनश्री काशीद उपस्थित होते. वाचनालयात हजारो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

वाचनालय

मुख्याध्यापक असिफ शेख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. मुलांचा मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे, वाचन व संवाद कौशल्य वाढवणे आणि अभ्यासाची गोडी लावून व्यक्तिमत्त्व विकास करणे हे यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचनालय

रुकसाना शेख यांनी मार्गदर्शनात सांगितले की, वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. शैक्षणिक कार्यात प्रेरणा मिळून वाचनातूनच आदर्श नागरिक घडतात. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे सामर्थ्य वाचनात आहे. त्यामुळे या अभियानानुसार सायंकाळी ७ ते ८ मोबाईल बंद ठेवून वाचनासाठी वेळ देणे गरजेचे आहे. सुधीर चव्हाण आणि केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांनी वाचन अभियानाचे रूपांतर चळवळीत करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला प्रतिसाद देत उपस्थित पालकांनी वाचनालयाला प्रत्येकी पाच पुस्तके भेट दिली.

कार्यक्रमास शिक्षिका सुनीता कर्जुले राऊत, शिक्षक साईनाथ वडते, अण्णासाहेब शिंदे, कामिनी बायस, संध्या लोंढे-नांगरे, विद्या खामकर, ज्योती गाडेकर, मीनाक्षी लोळगे, अर्चना बोकारे, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर आणि पालक सुधाकर पडूरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब शिंदे यांनी केले, तर आभार सुनीता कर्जुले-राऊत यांनी मानले.

वाचनालय

वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता विकसित होते आणि त्यांना सतत प्रेरणा मिळते. आदर्श नागरिक घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे.
– रुक्साना शेख, शिक्षण विस्तार अधिकारी

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाचनालय
वाचनालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाचनालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!