सिद्धेश्वर
सिद्धेश्वर

नेवासा : गोदा-प्रवरासंगम तिरावरच्या टोका येथील सिद्धेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्री उत्सवानिमित्त एक लाखांवर भाविकांनी शिवालयात दर्शन घेतले.

सिद्धेश्वर

बारा क्विंटल साबुदाणातून पंचवीस हजार भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला. सायंकाळी जम्मूचे नंदकिशोर शर्मा यांच्या हस्ते मंदिरात आरती, अभिषेक करण्यात आला. शनिवारी मध्यरात्रीपासूनच सिद्धेश्वर शिवालयात भाविकांनी दर्शनाला गर्दी केली, तर रविवारी दुपारी भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला. शिल्पकलेचा अप्रतिम अविष्कार असलेल्या टोका येथील सिद्धेश्वर मंदिरात रविवारी पहाटे आरती, अभिषेक करण्यात आला, तर दिवसभर दुग्धाभिषेक सुरू होता.

सिद्धेश्वर

शनिवारी सकाळी धर्मध्वजारोहण व पालखी मिरवणूक सोहळा पार पडला.जम्मू येथील भाजपा नेते नंदकिशोर शर्मा यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पंचगंगाचे प्रभाकर शिंदे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले आदींच्या उपस्थितीत बालब्रह्मचारी महाराज यांच्या समाधी मंदिर परिसरातही महाशिवरात्री उत्सव साजरा झाला. नेवासा, गंगापूर, वैजापूर, संभाजीनगर, शेवगाव, पैठण, श्रीरामपूर भागातून भाविक दर्शनाला आले होते.

सिद्धेश्वर

सोमवारी चंद्रकांत पटारे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनंतर महाप्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता होणार आहे. पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सिद्धेश्वर मंदिरात दर्शन झाले की भाविक बालब्रम्हचारी महाराजांच्या समाधी स्थळी दर्शनाला गर्दी करीत होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सिद्धेश्वर
सिद्धेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सिद्धेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!