सोनई – “हर हर महादेव”च्या जयघोषाने सोनई परिसरातील शिवालये दुमदुमली. महाशिवरात्री निमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

मोरयाचिंचोरे येथील जागृत पोहीचा महादेव मंदिरात नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. हा सभामंडप माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर होऊन पूर्णत्वास आला आहे. लोकार्पण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

सोनईतील पुरातन त्रिलिंगी महादेव मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त मोठी भक्तीभावाची वातावरण निर्मिती झाली होती. कीर्तनकार ह.भ.प. राम महाराज खरवंडीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, “गेल्या २५ वर्षांपासून मी मित्रपरिवारासह पोहीचा महादेव मंदिरात येत आहे. येथे आल्याने मनाला ऊर्जा मिळते. मोरयाचिंचोरे व परिसरातील ग्रामस्थांनी मंदिर विकासासाठी एकत्रितपणे हातभार लावला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सभामंडप उभारण्यात आला असून त्यामुळे गैरसोय दूर होणार आहे. सत्ता असो वा नसो, परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.”

ग्रामस्थांच्या वतीने गणेश शिकारे यांनी मनोगत व्यक्त करत मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गडाख यांचे आभार मानले. कार्यक्रमानिमित्त दिवसभर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.
महाशिवरात्री निमित्त शंकरराव गडाख यांनी सोनई, हंडीनिमगाव व परिसरातील विविध महादेव मंदिरांना भेटी दिल्या. सोनई त्रिलिंगी महादेव मंदिर येथे तरुण मंडळांच्या वतीने खिचडी वाटपाचा उपक्रमही राबविण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

