नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळा मालकाकडून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अजय कृष्णा ठुबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे याबाबत योगेश भास्कर शिंदे ,पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील तक्रारदार यांचे शनिशिंगणापूर मंदिर समोर पूजा साहित्याचे दुकान असून सदर दुकानासमोर दर्शनास येणारे भाविकांच्या गाड्याा पार्क करून देणे व त्यांचे विरुद्ध कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस स्टेशन शनिशिंगणापूर येथील ठुबे पोलीस प्रती महिना 1500/- रुपये हप्ता घेतात. मागील महिन्याचा व चालू महिन्याचा हप्ता न दिल्याने ठुबे पोलीस दुकानावर येऊन हप्ता न दिल्यास खोट्या केस मध्ये अडकवून कारवाई करण्याची धमकी देतात. शनिशिंगणापूरचे ठुबे पोलीस हे 3000/- पैशाच्या लाचेची मागणी करीत असले बाबतची तक्रार केली होती.

दिनांक 16/02/2026 रोजी तक्रारीची पडताळणी करीता तक्रारदार व पंच क्र.1 यांना पोलीस स्टेशन शनिशिंगणापूर येथे पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता ठुबे पोलीस व तक्रारदार यांची पोलीस स्टेशन शनिशिंगणापूर शेजारील ग्रहराज नारळ सेंटरचे पार्किंगमध्ये येथे भेट झाली. भेटीदरम्यान तक्रारदाराचे दुकानासमोर भाविकांचे वाहने पार्क करून कारवाई न करणेबाबत चर्चा झाली. त्यावेळी ठुबे पोलीस यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे दुकानासमोर वाहने पार्क करून कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी मागील महिन्याचे व चालू महिन्याचे मिळून 3000/- रुपयाची लाच मागणी केल्याचे व स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी 2000/- लागलीच व 1000/- रुपये नंतर घेण्याबाबतची लाचमागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक 16/02/2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे ग्रहराज नारळ सेंटरचे पार्किंगमधे शनिशिंगणापुर येथे ठुबे यांनी तक्रारदार यांचेकडे कारवाई न करण्यासाठी लाच मागणी केलेल्या 3000/- रू पैकी सध्या 2000/- रू. लाच रक्कम स्वतःसाठी पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.या फिर्यादीवरून गु.आर.क्र.२६/२६ कलम
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर , शशिकांत शिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. छत्रपती संभाजीनगर , पोहकॉ अशोक नागरगोजे, ,पोकों प्रकाश नागरगोजे, चापोकों रामेश्वर ताटे यांनी केली आहे
पुढील तपास राजु आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. अहिल्यानगर हे करत आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

